Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nusrat Bharucha:चांगली बातमी!अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायल मध्ये सुरक्षित, टीमने दिली ही माहिती

Nusrat Bharucha
, रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (12:31 IST)
Nusrat Bharucha:पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील वातावरण तापले आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केला, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. दरम्यान, नुसरत भरुचाबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन दहशतवादी गट यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात ही अभिनेत्री इस्रायलमध्ये अडकली आहे. नुसरतच्या टीममधील एका सदस्याने स्वतः याबाबत माहिती दिली आणि अभिनेत्रीशी संपर्क तुटल्याची माहिती देऊन चाहत्यांची चिंता वाढवली. मात्र, आता नुसरतबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
 
नुसरत भरुचाच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'दुर्दैवाने नुसरत इस्रायलमध्ये अडकली आहे. हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. टीम सदस्याच्या म्हणण्यानुसार, 'शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मी तिच्याशी शेवटचा संपर्क साधला, जेव्हा ती तळघरात सुरक्षित होती. सुरक्षा उपायांसाठी, अधिक तपशील उघड करणे शक्य नाही. मात्र, तेव्हापासून आमचा संपर्क होऊ शकलेला नाही. आम्ही नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ती निरोगी आणि सुरक्षित परतेल अशी आशा आहे.
 
नुसरत भरुचाच्या टीम मेंबर संचिता त्रिवेदी यांनी अभिनेत्रीबद्दल एक मोठे अपडेट शेअर केले आहे. संचिताने नुसरतशी संपर्क साधल्याचे सांगितले आहे. तसेच ती लवकरच भारतात परतणार आहे. संचिता म्हणाली, 'अखेर आम्ही अभिनेत्री नुसरत भरुचा यांच्याशी संपर्क साधण्यात यशस्वी झालो आणि दूतावासाच्या मदतीने तिला सुखरूप घरी आणले जात आहे. ती सुरक्षित असून भारतात येत आहे.
 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही युद्धाची घोषणा केली आहे. नेतान्याहू म्हणाले की आम्ही युद्धात आहोत, ऑपरेशनमध्ये नाही. हमासने इस्रायल आणि तेथील नागरिकांवर प्राणघातक हल्ला केला आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या वस्त्या साफ करण्याचे आदेश मी आधी दिले. शत्रूला इतकी किंमत मोजावी लागेल की त्यांनी कधीच विचार केला नसेल.




Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nusrat bharucha : अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये बेपत्ता,टीमशी संपर्क तुटला