Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Grammy Awards 2022 : 'ऑस्कर'नंतर आता लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ग्रॅमी अवॉर्ड्सला मुकले, चाहत्यांची झाली निराशा

webdunia
, सोमवार, 4 एप्रिल 2022 (12:37 IST)
ऑस्करनंतर आता नुकतीच यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारांची घोषणा झाली. हा पुरस्कार संगीत क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. सध्या या पुरस्कारांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेच. मागच्या वर्षभरात निधन झालेल्या जगातल्या सर्व कलाकारांना नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात मानवंदना देण्यात आली मात्र यात लता मंगेशकर यांचं नाव मात्र नव्हतं.  यामुळे भारतीय चाहत्यानी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
 
ऑस्करनंतर, ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यातही भारतीय पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचं नाव ‘इन मेमोरिअम’विभागातून वगळण्यात आलं. विशेष म्हणजे अकादमी पुरस्कारांच्या ‘इन मेमोरिअम’विभागाच्या यादीतही लतादीदींचं नाव नव्हतं. यामुळे त्यांचे चाहते हैराण झाले आहेत. ग्रॅमी २०२२ ‘इन मेमोरिअम’विभागात दिवंगत संगीतकार स्टीफन सोंधेम यांच्या गाण्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सिंथिया एरिव्हो, लेस्ली ओडोम जूनियर, बेन प्लॅट आणि रॅचेल झेगलर यांनी त्यांची गाणी सादर करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. याशिवाय टेलर हॉकिन्स आणि टॉम पार्कर यांच्याही आठवणींना उजाळा देण्यात आला. मात्र यात लता मंगेशकर यांचं नाव घेण्यात आलं नाही.
 
‘लतादीदी आणि दिलीप कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते, ज्याकडे या मानाचे पुरस्कार देणाऱ्या संस्थांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं’ असं चाहत्यांनी म्हटलं आहे. ‘हे अपेक्षित नव्हतं मात्र यामुळे आम्हाला आश्चर्य अजिबात वाटलं नाही’ असंही काही चाहत्यांचं म्हणणं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह बनली आई, मुलाला जन्म दिला