Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महानायकाचा 'हॅपी बर्थ डे'

महानायकाचा 'हॅपी बर्थ डे'

वेबदुनिया

महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. 'बिग बी' ही उपाधी मिळविणार्‍या अमिताभ यांचा हा वाढदिवस आज
जगभर साजरा होतो आहे. अमिताभ हे व्यक्तिमत्व जगभरातील चित्रपटप्रेमींना व्यापून उरल्याने त्यांच्या वाढदिवसाला जागतिक परिमाण लाभले आहे. जगभरातील त्यांचे फॅन्स हा वाढदिवस त्यांच्या पद्दतीने साजरा करत आहेत.

काही जण मिठाई वाटतात, काही जण त्यांची तब्ब्येत बरी रहावी यासाठी आपापल्या आराध्य देवताना गळ घालतात, काही त्यांचे चित्रपट पहातात. काही सामाजिक कार्य करतात. अमिताभ यांच्यावर चाहत्यांचे किती प्रेम आहे हे यातून दिसून येते.

'सात हिंदूस्थानी'पासून आपली अभिनय कारकिर्द सुरू करणार्‍या अमिताभला सुरवातीला यश मिळाले नव्हते. पण त्यानंतर त्यांची घोडदौड जी सुरू झाली ती अजून ही  वर्षीही थांबायचे नाव घेत नाहीये. त्यांच्या काळातील अनेक अभिनेते आज घरी रिकामे बसले आहेत किंवा बिनमहत्त्वाच्या भूमिका करत आहेत. पण आज खास अमिताभसाठी स्क्रिप्ट लिहिले जात आहेत. नव्या दिग्दर्शकांची पिढीही त्यांच्यासोबत काम करायला उत्सुक आहे. जुन्या निर्मात्यांबरोबर हिट चित्रपट देणार्‍या अमिताभने नव्या दिग्दर्शकांसोबतही हिट चित्रपट दिले आहेत. जुन्या आणि नव्या दिग्दर्शकांसोबत काम करूनही अमिताभ समकालीनच राहिले.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेबदुनियाच्या त्यांना शुभेच्छा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेखा झाली 63 वर्षांची!