बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी आज म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी 59 वा वाढदिवस साजरा करत आहेत.त्यांचा जन्म 1962 मध्ये नागपुरात झाला.हे बॉलीवूडचे असेच एक दिग्दर्शक आहेत ज्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांना लहानपणापासूनच नाटक आणि चित्रपटांची आवड होती. त्यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतले. सुरुवातीचा काळात ते अभिनेता होण्यासाठी शिकत होते . पण शिकताना त्यांना दिग्दर्शक बनावे असे वाटले.
सुरुवातीच्या काळात त्यांनी जाहिरातीसाठी काम केले. त्यानी मुन्नाभाई एमबीबीएस सारखे हिट चित्रपट बनवले. या चित्रपटाद्वारे राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाने देशाबरोबरच परदेशातही चांगली कमाई केली. त्यांच्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. तीन वर्षा नंतर त्यांनी लगे रहो मुन्नाभाई बनवला हा देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
यानंतर, 2009 मध्ये चेतन भगतच्या पुस्तकावर आधारित 3 इडियट्स या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. या चित्रपटानंतर 2014 मध्ये 'पीके' आला होता. हा चित्रपट दिग्दर्शकाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट मानला जातो.राजकुमार हिरानी यांना आतापर्यंत 11 फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ..
त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.