Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनमध्ये प्रदर्शित होणार हृतिक, यामीचा 'काबिल'

चीनमध्ये प्रदर्शित होणार हृतिक, यामीचा 'काबिल'
, सोमवार, 20 मे 2019 (10:06 IST)
बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन आणि यामी गौतम यांचा 'काबिल' चित्रपट तुफान हिट झाला होता. हृतिक आणि यामी या दोघांनीही चित्रपटात अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट आता चीनमध्येदेखील रिलीज होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे चिनी पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. आजवर भारतीय चित्रपटांना चिनी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चिनी बॉक्स ऑफिसवर 'दंगल', 'बजरंगी भाईजान', 'सिक्रेट सुपरस्टार', 'हिंदी मीडियम', 'हिचकी', ' मॉम',  'अंधाधून'यांसारख्या चित्रपटांनी 100 कोटींच्या पुढे कमाई केली आहे. आता चीनमध्ये जाण्यासाठी 'काबिल' चित्रपटही सज्ज झाला आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणारा ह्रतिकचा हा पहिलाच चित्रपट आहे.
 
भारतात 'काबिल' चित्रपटाने 103.84 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटाला जोरदार टटक्कर दिली होती.
 
'काबिल' चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले होते. या चित्रपटाचे चिनी भाषेतले पोस्टर सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केले आहे. हा चित्रपट चीनमध्ये 5 जून 2019 रोजी रिलीज होईल. या चित्रपटाला आता चिनी प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गली बॉयनंतर आता '83' या चित्रपटासाठी गाणं गाऊ शकतो रणवीर सिंग