Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘ती संधी काही अजून मिळाली नाही’,शाहरुख खानने व्यक्त केली मनातील खदखद

‘ती संधी काही अजून मिळाली नाही’,शाहरुख खानने व्यक्त केली मनातील खदखद
, सोमवार, 12 डिसेंबर 2022 (14:08 IST)
मुंबई : किंग खान हा बॉलीवूडप्रेमींचा लाडका नट.म्हणूनच शाहरुख खान चित्रपटात असला की चित्रपट हिट होणारच हे समीकरणच झाले आहे. त्याची कारकीर्द देखील अशाच हिट चित्रपटांनी भरगच्च भरली आहे. चाहत्यांच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळवणारा हा अभिनेता आपल्या कारकिर्दीबाबत पूर्णपणे समाधानी नाही. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने त्याची ही खंत व्यक्त केली आहे.
 
शाहरुख सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. तीन वर्ष मोठ्या पडद्यापासून लांब राहिलेला शाहरुख रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. शाहरुख नुकताच सौदीमध्ये ‘डंकी’या त्याच्या पुढील चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला होता. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यावर त्याने मक्केतील मशिदीला भेट देऊन तिथे प्रार्थनादेखील केली. त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
 
सौदीमध्ये असतानाच शाहरुखला आणखी एका प्रतिष्ठित कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. सौदीमध्ये पार पडलेल्या ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तो सन्माननीय पाहुणा होता. शाहरुखबरोबरच अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनेदेखील या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास हजेरी लावली. या सोहळ्यात चित्रपटक्षेत्रातील योगदानाबद्दल शाहरुखला पुरस्कारही देण्यात आला.
 
या मंचावर शाहरुखची एक छोटीशी मुलाखतही घेण्यात आली. या मुलाखतीतच त्याने आपली खंत व्यक्त केली आहे. शाहरुख सांगतो, नायक म्हणून मी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. खलनायकाची भूमिका देखील केली आहे. माझे काही चित्रपट हे सामाजिक विषयांना धरून आहेत. पण, आजवर मला एकही ऍक्शनपट मिळालेला नाही, ही माझी खंत आहे. मी आज 57 वर्षांचा आहे. पण, इतक्या वर्षात मला साधी विचारणाही होऊ नये?
 
या मुलाखतीत शाहरुखला कोणत्या धाटणीचे चित्रपट करायचे आहेत हे त्याने स्पष्ट केलं. त्यावर शाहरुख सांगतो, मला आता ‘मिशन इम्पॉसिबल’सारखे जबरदस्त अॅक्शन असणारे चित्रपट करायचे आहेत. गेल्या काही वर्षात माझ्या कंपनीने व्हीएफएक्स आणि इतर ज्या गोष्टीत प्रगती केली आहे त्याचा वापर करून मी एखादा अॅक्शन चित्रपट करणार आहे. तरूणांना, माझ्या मुलांना असे चित्रपट आवडतात आणि ‘पठाण’हा एक अॅक्शनपटच आहे.”या मुलाखतीचा एक छोटा भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शाहरुखचा ‘पठाण’प्रदर्शित होणार आहे. शिवाय दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याबरोबर शाहरुख ‘डंकी’या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर अभिनेत्री तापसी पन्नूही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘डंकी’हा चित्रपट पुढच्यावर्षी डिसेंबरमध्ये चित्रपटगृहात येणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shahrukh Khan in Vaishno Devi शाहरुख खान पोहोचला माँ वैष्णोदेवीच्या दरबारात, व्हिडिओ झाला व्हायरल