Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत अल्लू अर्जुनने चक्क मराठीत साधला संवाद, म्हणाला…

मुंबईत अल्लू अर्जुनने चक्क मराठीत साधला संवाद, म्हणाला…
, सोमवार, 20 डिसेंबर 2021 (15:35 IST)
दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते गर्दी करताना दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतंच अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी अल्लू अर्जुनने चक्क मराठीत संवाद साधला. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे .
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना याचा पुष्पा हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मुंबईत एका प्रमोशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अल्लू अर्जुन, रश्मिका मंदनासह इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी अल्लू अर्जुनने चक्क मराठीत संवाद साधला .यावेळी अल्लू अर्जुन जेव्हा उपस्थितांशी संवाद साधायला उठला तेव्हा तो म्हणाला, ‘सगळ्यांना माझा नमस्कार…’ याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Watch Bollywood नावाच्या एका युट्यूब चॅनलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीचे समन्स