Publish Date: Thu, 27 Oct 2016 (11:14 IST)
Updated Date: Thu, 27 Oct 2016 (11:16 IST)
‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘शिवाय’ या दोन्ही दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यास पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. भारताने पाक कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकने भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घातली असल्याचे फॉक्स स्टार आणि रिलायन्स एंटरटेन्मेंटने सांगितले आहे.