पंजाबच्या भटिंडा येथील सनी हिंदुस्तानीने इंडियन आयडॉलच्या विजेतेपदावर नाव कोरलं आहे. गरीब पार्श्वभूमी असणाऱ्या सनीची आई फुगे विकण्याचा व्यवसाय करत होती. तर सनी स्वत: उपजीविकेसाठी बूट पॉलिश करत असे. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत सनीने सर्वांना मागे टाकत इंडियन आयडॉलचं विजेतपद पटकावलं आहे.
महाराष्ट्रातील रोहित राऊत हा या स्पर्धेचा उपविजेता ठरला. विजेतेपद पटकावणाऱ्या सनी हिंदुस्तानीला 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रोहितला 5 लाखांचं बक्षीस देण्यात आलं आहे.