Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

इंडियन आयडॉल 15 ची स्पर्धक रितिकाची लता मंगेशकरसोबत झालेली अविस्मरणीय भेट

Indian Idol 15 contestant Ritika
, शनिवार, 1 मार्च 2025 (15:55 IST)
या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 मध्ये प्रेक्षकांना ‘सेलिब्रेटिंग 100 यर्स ऑफ मदन मोहन’ या विशेष भागात एक सुरेल प्रवास घडणार आहे. कार्यक्रमाची रंजकता आणि शोभा वाढवण्यासाठी शबाना आझमी, अंजली आनंद, शालिनी पांडे, मनोज मुंतशिर आणि नितीन मुकेश या भागात सहभागी होणार आहेत. ‘आयडॉल की बसंती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रितिका राजने ‘आपकी नजरों ने समझा’ आणि ‘मिलो न तुम तो हम घबराए’ ही गाणी सादर करून सर्वांना अवाक केले.
इतकेच नाही, तर रितिकाने महान गायिका, गान सरस्वती लता मंगेशकर यांची भेट झाल्याचा एक किस्साही सांगितला. त्यामुळे हा भाग आणखी रोचक होऊन गेला. रितिका म्हणाली, “माझ्याकडे एक फोटो आहे, ज्यामध्ये मी 13 वर्षाची आहे. या फोटोत माझे डोके लता जींच्या मांडीवर विसावले आहे. लताजींनी जेव्हा प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या भोवती एक आभा आम्हाला जाणवली होती. त्यांनी नमस्कार करून सर्वांना अभिवादन केले आणि आम्हाला खाली बसायला सांगितले व वातावरण हलके-फुलके करण्याचा प्रयत्न केला.
ALSO READ: बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटाने काँग्रेसवर टीका केली
अवघ्या दोन तासांत, त्यांनी इतक्या गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या! रेकॉर्डिंग कसे होते ते आम्हाला समजावले. त्यांनी आमच्यासाठी समोसे देखील मागवले. त्यांच्यासमोर खाताना आम्हाला अवघडल्यासारखे झाले होते, पण त्या म्हणाल्या,  “मी सुद्धा सगळं खाते. त्यामुळे तुम्हालाही हे खायला हरकत नाही.” रितिकाच्या मते त्या महान गानसाम्राज्ञीशी झालेली भेट म्हणजे तिला मिळालेला देवाचा आशीर्वादच होता.
ALSO READ: अभिनेता सुनील शेट्टीचा जेव्हा... अमेरिका पोलिसांनी केला अपमान, अजूनही स्मरणात आहे
ती पुढे सांगते, “भविष्यात काय दडले आहे, मी किती यशस्वी होणार ते मला माहीत नाही. पण मला वाटते माझे जीवन धन्य झाले आहे, कारण मला दोन सरस्वती मांकडून आशीर्वाद मिळाला आहे – लता जी आणि श्रेया जी.”
बघायला विसरू नका, इंडियन आयडॉल सीझन 15, दर शनि-रवी रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केजीएफ 2'ला मागे टाकत 'छावा' 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील