Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ira Khan Engagement: आमिर खानची मुलगी आयराचा साखरपुडा

ira khan
, शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (11:55 IST)
Ira Khan Engagement:आमिर खानची लाडकी मुलगी इरा खान नुपूर शिखरेला बऱ्याच काळापासून डेट करत आहे, दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आता नुकतेच दोघांनी मुंबईत धूमधडाक्यात एंगेजमेंट केली, ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

काही काळापूर्वी नुपूरने आयराला फिल्मी पद्धतीने प्रपोज केले होते, त्यानंतर दोघांनीही त्यांच्या नात्याला एक पाऊल पुढे टाकले आणि कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये इरा गुलाबी ऑफ शोल्डर गाऊनमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. दोघांच्या एंगेजमेंटला उपस्थित राहण्यासाठी अनेक स्टार्स पोहोचले होते.

दोघांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दोघेही एकत्र खूप छान दिसत होते,
एंगेजमेंटच्या या खास दिवशी आयरा खान लाल रंगाच्या ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये दिसली, तर नुपूरने टक्सिडो परिधान केला होता.
 
आयरा खान आणि नुपूर शिखरेची प्रेमकहाणी 2020 मध्ये सुरू झाली होती. लॉकडाऊन दरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले. व्हॅलेंटाईन वीकमध्ये त्यांचे नाते अधिकृत झाल्यापासून दोघांनी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर केले आहेत. त्याचवेळी, या वर्षी सप्टेंबरमध्ये नुपूरने एका स्पर्धेनंतर आयराला अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

किरण मानेंची ‘बिग बॉस मराठी’मधील कविता व्हायरल