Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंगना रनौतला शेतकऱ्यांना ‘खलिस्तानी’ म्हणणं महागात पडणार

कंगना रनौतला शेतकऱ्यांना ‘खलिस्तानी’ म्हणणं  महागात पडणार
, बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (08:09 IST)
वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कंगना रनौतविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. खार पोलिस ठाण्यात कंगनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी  महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
शीख समुदायाबाबत कंगना रनौतनं नुकतेच इंस्टाग्रामवर  आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे शीख समुदायातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अभिनेत्री कंगना रनौत विरोधात खार पोलीस ठाण्यात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशानंतर एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कंगनाने इन्साग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने तिच्या मुंबईतील खारमधल्या घरासमोर शीख समुदायाकडून निदर्शने करण्यात आली. तसेच कंगनाविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. कंगनाला मुंबईतूनच नव्हे तर राज्यातून हद्दपार करा, अशी मागणी शीख समुदायाकडून करण्यात आली होती. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jersey Trailer Out: शाहिद कपूरच्या 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज