Publish Date: Fri, 14 Jun 2019 (10:30 IST)
Updated Date: Fri, 14 Jun 2019 (11:36 IST)
बॉलीवूड एक्ट्रेस जॅक्लीन फर्नांडिस आपल्या बोल्ड आणि ग्लॅमर्स अदांमुळे ओळखली जाते. ती सध्या आपल्या बहिणीसोबत सुट्या घालवत आहे आणि तेथून ती फोटो शेअर करत आहे. वेकेशनदरम्यान जॅक्लीन गुलाबी रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसली, ज्यावर लिहिले आहे 'बार्बी'.
जॅक्लीनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वत:चे फोटो टाकले आहे, ज्यात ती सुट्यांमध्ये आपल्या बहिणीसोबत मस्ती करताना दिसत आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांनी फार पसंत केले आहे.
जॅक्लीन चश्म्यात आणि हाय पोनीटेलसोबत सुट्यांचा मजा घेत आहे. जॅक्लीन आपल्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त हा वेकेशन सेलीब्रेट करत आहे.
जॅक्लीनने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, माझी बहिणी 'पू गेरी'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही नेहमी बिकनी बॉडीजसाठी मेहनत करतो, पण यासाठी सकाळची कॉफी आणि क्रोइसेन खाणे सोडत नाही.