Publish Date: Sat, 03 Jun 2017 (13:01 IST)
Updated Date: Sat, 03 Jun 2017 (13:09 IST)
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिंदी सिनेदृष्टीत पदार्पण करायला सज्ज झाली आहे. नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमाचा रिमेक हिंदीमध्येही होणार आहे. स्वत: करण जोहर या सिनेमाचा रिमेक करणार आहे. या सिनेमात जान्हवी कपूर आर्चीची भूमिका बजावणार हे जवळपास निश्चितच झालं होतं. पण तिचा परश्या कोण असणार या बद्दल मात्र अजून काहीही निश्चित करण्यात आले नव्हते. पण अखेर आर्चीला तिचा परश्या भेटलाच असे म्हणावे लागले कारण करणने त्याच्या सिनेमासाठी जान्हवी सोबत शहिद कपूरचा भाऊ इशान खत्तर याचे नाव निश्चित केले आहे. सैराटच्या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक शशांक खैतान करणार आहे.