Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुलकरसोबत जमणार जान्हवीची जोडी?

दुलकरसोबत जमणार जान्हवीची जोडी?
, मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (10:44 IST)
करण जोहर निर्मिती 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडवर जोरदार 'धडक' देणार्‍या जान्हवी कपूरकडे सध्या ऑफर्सची कमी नाही. ईशान खट्टरसोबत  'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याबरोबर तिला करण जोहरचाच 'तख्त' हा दुसरा सिनेमा मिळाला. तूर्तास जान्हवी या मल्टीस्टारर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'तख्त'मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारित असणार आहे. 2020 मध्ये प्रदर्शित होणार्‍या या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे. हा चित्रपट संपण्याआधीच जान्हवीच्या तिसर्‍या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. होय, सूत्राच्या माहितीनुसार, जान्हवी कपूर आपल्या तिसर्‍या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. या सिनेमात ती आर्मी  ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहेत. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जान्हवीच्या तिसर्‍या सिनेमाची कथा व इतर कलाकारांबाबत अद्याप काहीही समजू शकलेले नाही. त्यामुळे या सिनोबद्दल जाणून घेण्यासाठी जान्हवीचे चाहते खूप उत्सुक आहेत. पण चित्रपटाबद्दलची ताजी बाती म्हणजे, या चित्रपटात जान्हवीच्या अपोझिट दुलकर दिसणार असल्याची खबर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"प्रेमवारी" चित्रपटाचे पोस्टर लाँच