Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जावेद अख्तरच्या अडचणीत वाढ : जावेद अख्तर यांना कारणे दाखवा नोटीस ,RSS ची तुलना तालिबानशी केली

जावेद अख्तरच्या अडचणीत वाढ : जावेद अख्तर यांना कारणे दाखवा नोटीस ,RSS ची तुलना तालिबानशी केली
, मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (14:30 IST)
जावेद अख्तर बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकतात ते त्यांच्या माध्यमांमधील केलेल्या वक्तव्यामुळे.अलीकडेच जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना कथितपणे तालिबानशी केली होती. या प्रकरणी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातील ठाणे न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे.  
 
सुप्रसिद्ध बॉलिवूड लेखक जावेद अख्तर अनेकदा माध्यमांसमोर केलेल्या त्यांच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडतात.अलीकडेच जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना कथितपणे तालिबानशी केली होती. या प्रकरणी महाराष्ट्रातील ठाणे न्यायालयात जावेद अख्तरविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात न्यायालयाने जावेद अख्तर यांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

मुख्य न्यायदंडाधिकारी आणि वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात आरएसएसच्या कार्यकर्ता विवेक चंपानेरकर यांनी जावेद अखतरच्या विरोधात खटला दाखल केला आहे.आणि न्यायालयाने अखतर यांना कारणे दाखवा नोटीसचे उत्तर 12 नोव्हेंबर पर्यंत देण्यास सांगितले आहे.
 
या प्रकरणाशी संबंधित वकील संतोष दुबे म्हणाले की,जर जावेद अख्तर 'बिनशर्त लिखित माफी' देण्यास आणि नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास अयशस्वी झाले तर ते अख्तरला 100 कोटी रुपये भरण्यास सांगतील. नुकसान म्हणून त्यांच्यावर मागणी केल्यानुसार फौजदारी खटला दाखल करणार वकिलांनी दावा केला की, अशी विधाने करून जावेद अख्तर यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 499 (मानहानी) आणि 500 ​​(बदनामीसाठी शिक्षा)अंतर्गत गुन्हा केला आहे.
 
प्रकरण काय असे जाणून घ्या 
 एका मीडिया चॅनेलवर संभाषण दरम्यान, 76 वर्षीय लेखक आणि कवी जावेद अख्तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यांचे नाव न घेता, 'तालिबान इस्लामी देश करू इच्छित आहे आणि या लोकांना हिंदू राष्ट्र करायचे आहे.' म्हटले होते याआधी, जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वक्तव्य केले होते, तेव्हा एका वकीलाने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागायला सांगितली होती..
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PM मोदींनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, दीदींसाठी हे खास ट्विट केलं