Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काळवीट प्रकरणः सलमानला कोर्टाचा दिलासा

काळवीट प्रकरणः सलमानला कोर्टाचा दिलासा
सलमान खानसाठी एक चांगली बातमी आहे की काळवीट प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमानला खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणात दिलासा दिला आहे. 
 
काळवीट शिकार प्रकरणात खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या प्रकरणातही सलमान खानला निर्दोष ठरवण्यात आलं आहे. 2006 मध्ये सलमान खानने खोटं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं होतं. मागील सुनावणीत यावर निर्णय सुरक्षित ठेवण्यात आलं होतं. खोटं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्याचा सलमानचा हेतू नव्हता असा दावाही त्याच्या वकिलांनी केला आहे. 
 
या प्रतिज्ञापत्रात सलमानने त्याचा शस्त्र बाळगण्याचा परवाना हरवल्याचं नमूद केलं होतं. सलमानवर काळवीट प्रकरणात तीन केस दाखल झाले होते. त्यातून एक आर्म्स अॅक्ट प्रकरणात सलमानला मागील वर्षी दिलासा मिळाला होता. या प्रकरणाची सुनावणी दरम्यान सलमानने हा परवाना हरवल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले होते.
 
सलमानचा शस्त्र परवाना हरवला नसून तो नुतनीकरणासाठी दिल्याची माहिती उघडकीस आली होती. त्यामुळे सलमान खानने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई केली जावी अशी मागणी 2006 साली करण्यात आली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्षय कुमारसोबत पावसात रोमांस करेल कॅटरीना कैफ, रीक्रिएट होईल गाणं