Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 26 April 2025
webdunia

जॉनवर अक्षय रागावला

john
, बुधवार, 11 जुलै 2018 (11:20 IST)
जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र सध्या या दोघांध्ये काहीतरी बिनसले आहे. विशेषतः अक्षय कुारला जॉन अब्राहचा राग आला असल्याचे समजते आहे. दोघांचेही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार असल्याने ही नाराजी निर्माण झाली आहे. अक्षयचा 'गोल्ड' आणि जॉनचा 'सत्यमेव जयते' एकाच दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला रिलीज होणार असे समजते आहे. ही टक्कर टाळण्याचा अक्षयने प्रयत्न केला. पण त्याला जॉनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही. अक्षय आणि मी चांगले मित्र आहोत, पण आपल्या सिनेमांना एकावेळी रिलीज होण्याच्या मुद्द्यापेक्षा अन्य मुद्द्यांवर आम्ही खूप मनमोकळेपणे बोललोही आहोत. एकमेकांना शुभेच्छाही दिल्या आहेत, असे तो म्हणाला. म्हणूनच अक्षय जॉनवर नाराज आहे. त्यानेही आपल्या स्टाइलने जॉनला उत्तर दिले आहे. आपला सिनेमा अन्य कोणत्याही कलाकाराच्या सिनेमाबरोबर रिलीज करण्यास कोणाचेही बंधन नाही. पुढच्यावेळी मी देखील असेच करेन, असे त्याने म्हटले आहे. पुढच्यावेळी जॉनलाही ही अडचण येणार हे आता उघड झाले आहे. अक्षय आणि जॉनने मिळून 'गरम साला', 'देसी बॉईज' आणि 'हाऊसफुल्ल 2' सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘ब्रह्मास्त्र’मध्ये नागार्जुन झळकणार