Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जस्टिन बीबर, जो 13 वर्षाच्या वयात 'बेबी-बेबी' करत यूट्यूबवर झाला होता स्‍टार

जस्टिन बीबर, जो 13 वर्षाच्या वयात 'बेबी-बेबी' करत यूट्यूबवर झाला होता स्‍टार
कॅनेडियन पॉपस्‍टार जस्टिन बीबर आज जग भरात नावाजलेला स्टार असून करोडो फॅन्स त्याचे चाहते आहे. जगातील कुठल्याही कोपर्‍यातून कदाचितच कोणी असेल जो या 23 वर्षीय पॉप सिंगिंगचा चाहता नसेल. ग्रॅमी अवॉर्ड मिळवून चुकलेला जस्टिन बीबर, पॉप संगीतच्या बाबतीत एवढ्या कमी वयात असे शिखर गाठणारा पहिलाच स्टार असेल. पण काय तुम्हाला माहीत आहे की या स्टारची सुरुवात फक्त एक यूट्यूब व्हिडिओपासून झाली होती ज्याला त्याच्या आईने यूट्यूबवर अपलोड केले होते. 13 वर्षाच्या जस्टिन बीबरच्या ह्या व्हिडिओने त्या वेळेस इंटरनेटवर अशी काही धूम केली की प्रत्येक जण त्याचे दिवाने झाले.  
 
जस्टिन बीबरला सुपरस्‍टार बनण्यात त्याची आई पॅटी मॅलेटीचा सर्वात मोठा हात आहे. महत्त्वाचे म्हणजे जस्टिनला गाण्याचा शौक होता आणि तो नेहमी गाणे गात राहत होता. असेच एका दिवशी त्याच्या आईने 12 वर्षाच्या जस्टिनने गायलेले एका गाण्याचे व्हिडिओ बनवले आणि त्याला यूट्यूबवर अपलोड करून दिले.  
 
त्या वेळेस बिजनेसमॅन स्कूटर ब्रॉन काही नवीन सिंगिंग टॅलेंटच्या शोधात यू-ट्यूबचे व्हिडिओ बघत होते आणि त्याच वेळेस त्यांनी जस्टिनचा व्हिडिओ ऐकला. जस्टिनला एकल्यानंतर स्कूटर ब्रॉन त्याच्या शोधात निघाले आणि त्यांनी जस्टिनला शोधून काढले.  
 
फोर्ब्‍स मॅगझिननुसार मागच्या वर्षी बीबरची कमाई 56 मिलियन डॉलर ( किमान 362 कोटी रुपये ) एवढी होती. बुधवारी प्रथमच जस्टिन बीबर आपल्या  कॉन्‍सर्टसाठी भारतात येत आहे. जस्टिन बीबरचा कॉन्‍सर्ट आज सायंकाळी 4 वाजता नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येत आहे जेथे बॉलीवूडचे मोठे स्टार्स दिसणार आहे. जस्टिन आपल्या 'पर्पज टूर'साठी भारतात आला होता. बीबरला लाइव्ह बघण्यासाठी किमान 45 हजारांपेक्षा जास्त लोक स्टेडियममध्ये येण्याची आशंका आहे आणि मुंबई पोलिसांनी स्टेडियमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 25 अधिकार्‍यांसोबत 500 कर्मचार्‍यांना तैनात केले आहे.  
 
सांगायचे म्हणजे भारत येण्याअगोदर जस्टिनने आपली डिमांड लिस्ट दिली आहे जी फारच लांब लचक आहे. त्याने भारतात थांबण्यासाठी स्वत:साठी बर्‍याच वस्तूंची डिमांड केली आहे, ज्यात एक रॉल्स रॉयस कार, एक निजी विमान, एक हेलिकॉप्टर, जकूजी इत्यादी सामील आहे. 23 वर्षाचे गायक  आपल्यासोबत आपली टेबल टेनिसची टेबल, प्लेस्टेशन, सोफा सेट, एक राजसी खुर्ची , वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, वार्डरोब कपबोर्ड आणि एक मसाज टेबल घेऊन येत आहे ज्याने तो रिकाम्या वेळेत आराम करू शकेल.  
 
भारताने जस्टिनच्या सुरक्षेची जबाबदारी सलमान खानचा बॉडीगार्ड शेराला दिली आहे. शेरा ने या अगोदर जॅकी चैनच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली होती.   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सैफच्या मुलीला लाँच करणार सलमान