अभिनेत्री काजोलच्या आगामी 'हेलीकॉप्टर ईला' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. प्रदिप सरकार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता रिद्धी सेन प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात तो काजोलच्या मुलाची भूमिका साकारतोय. येत्या ७ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटात काजोल एका २२ वर्षीय मुलाची आई आहे. काजोल अशा एका आईची भूमिका निभावणार आहे. जी आपल्या मुलासाठी स्वत:लाच विसरून जाते. तिचे सतत मुलासोबत राहाण्याचे प्रयत्न त्यांच्या नात्यातच दरी निर्माण करतात. यावरच ही कथा आधारित आहे.