Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हायरल होतोय काजोलचा व्हिडिओ

व्हायरल होतोय काजोलचा व्हिडिओ
, गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (21:26 IST)
बॉलिवूड अभिनेत्री काजोल नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. पण यावेळी नेटकऱ्यांनी तिला रडारवर घेतले आहे. काजोल बुधवारी एका मॉलमधून बाहेर पडताना दिसून आली. 
 
या व्हिडिओमध्ये काजोल कारमध्ये बसल्यानंतर, तिच्या कारचा दरवाजा उघडून एका चिमुरडीला पैसे देताना दिसत आहे. तिला पैसे देताच आणखी एक गरीब मुलगाही तिच्या कारकडे धावतो आणि काजोलच्या कारची खिडकी नॉक करतो. मात्र, यावेळी काजोल त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर, आता लोक काजोलला ट्रोल करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट करताना म्हटले आहे, की 'दुसरा मुलगा पैसे घेण्यासाठी आला, पण दिले नाही, काजोलकडे पैशांची कमतरता निर्माण झाली आहे का?'. तसेच आणखी एका युजरने म्हटले आहे, की 'आपल्याकडे तर एढे पैसे आहेत. या मुलाला 100 रुपये जरी दिले असते, तर आपली संपत्ती कमी झाली नसती मॅम.' आणखी एका युजरने तर, 'जेवढे मोठे लोक, तेवढे मोठे भिकारी असतात,' असे म्हटले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoo
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'Jai Shri Ram' song अक्षय कुमारच्या 'राम सेतू' चित्रपटातील 'जय श्री राम' गाणे झाले रिलीज