rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंगना आणि करण जोहरमध्ये वाद शाब्दिक युद्ध सुरूच

kangana ranawat
, गुरूवार, 9 मार्च 2017 (10:52 IST)
' मला इंडस्ट्री सोडायला सांगण्याचा करणाला काहीही अधिकार नाही. ही फिल्म इंडस्ट्री म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या २० वर्षी भेट दिलेला एखादा स्टुडिओ नाहीये. ही इंडस्ट्री प्रत्येक भारतीयाची आहे आणि इथे काम करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे' असे खडे बोल कंगनाने करणला सुनावले आहेत. याआधी चित्रपटसृष्टीत राहण्याचा त्रास होत असेल तर कंगनाने ही इंडस्ट्री सोडावी' अशा शब्दांत दिग्दर्शक करण जोहरने अभिनेत्री कंगना राणौतवर निशाणा साधला होता.  ' कॉफी विथ करण'मध्ये येऊन करणलाच घराणेशाहीबद्दल चार शब्द सुनावणा-या कंगनावर करणने  टीकास्त्र सोडले होते. त्याच्या याच आरोपांना कंगनाने चोख शब्दांत प्रत्युत्तर दिले. ' मला इंडस्ट्री सोडायला सांगण्याचा करणाला काहीही अधिकार नाही. ही फिल्म इंडस्ट्री म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या २० वर्षी भेट दिलेला एखादा स्टुडिओ नाहीये. ही इंडस्ट्री प्रत्येक भारतीयाची आहे आणि इथे काम करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे' असे खडे बोल कंगनाने करणला सुनावले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राम गोपाल वर्माकडून जागतिक महिला दिनाच्या वादग्रस्त शुभेच्छा