Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंगना रनौत हिने मुंबई पोलिसांच्या समन्सला उत्तर दिले, म्हणाली- काही हरकत नाही, मी लवकरच येईन

कंगना रनौत हिने मुंबई पोलिसांच्या समन्सला उत्तर दिले, म्हणाली- काही हरकत नाही, मी लवकरच येईन
, गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (13:58 IST)
शेतकऱ्यांचा अपमान केल्यामुळे आधीच FIR दाखल झालेल्या कंगनाविरोधात आता धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल झाली आहे. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी (mumbai police)कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेलला समन्स पाठवण्यात आला आहे. दोघींना पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
 
कंगनाचा मुंबई पोलिसांवर हल्ला
मुंबई पोलिसांच्या या समन्सवर कंगनाने आता प्रतिक्रिया दिली आहे. नेहमीप्रमाणे कंगनाने (kangana ranaut) मुंबई पोलिसांची खिल्ली उडवली आहे. तिने मुंबई पोलिसांना पप्पूप्रो सेना असं म्हटलं आहे. तिने ट्विटमध्ये लिहिले की, 'किती पछाडलेली आहे ही पेंग्विन सेना. महाराष्ट्राचे पप्पूप्रो. फार आठवण येते क-क-क-क कंगना, काही हरकत नाही. लवकरच येईन'. कंगनाचं मुंबई पोलिसांना पप्पूप्रो म्हणणं नव्या वादाला तोंड फोडू शकतं. याआधी तिने सोनिया सेनासारख्या शब्दांचा वापर केला होता.
 
काय आहे प्रकरण?
१७ ऑक्टोबरला कंगनाविरोधात कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी तिला मुबंई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 
 
कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी कंगना राणौतने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाप्रकरणी वांद्रे कोर्टाने कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेता सुरेंद्र बंतवालचा मृतदेह त्याचा राहत्या आढळला, पोलिस घटनास्थळी दाखल झाले