Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंगनाचा ‘थलायवी'लवकरच

कंगनाचा ‘थलायवी'लवकरच
, मंगळवार, 2 मार्च 2021 (08:17 IST)
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी तिने कुठलं वादग्रस्त वक्तव्य वगैरे केलेलं नाहीये. तर आता ती चर्चेत आहे तिच्या आगामी चित्रपटामुळे. कंगना राणावतच्या ‘थलायवी' या चित्रपटाबद्दल बर्या्च चर्चा सुरु आहेत.
 
हा चित्रपट तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जयललिता यांच्या जयंतीनिमित्त जाहीर केली आहे. येत्या 23 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीमने मोशन पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. अभिनेत्री कंगनानेही हे मोशन पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलं.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निक्की तांबोळी लवकरच बॉलिवूडमध्ये