Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोणीच पाठिंबा देत नाही म्हणून करण जोहरने घेतला ‘हा’ निर्णय

कोणीच पाठिंबा देत नाही म्हणून करण जोहरने घेतला ‘हा’ निर्णय
, सोमवार, 29 जून 2020 (08:42 IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (Sushant singh rajput suicide case)सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरू झाला. निर्माता दिग्दर्शक करण जोहरवर (Karan Johar)सडकून टीका झाली. इतकंच नव्हे तर या सर्व वादामुळे करण जोहर (karan johar upset with film fraternity) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अजिबात सक्रिय नाही. 
  
त्याने ट्विटरवर अनेकांना अनफॉलो केलं असून अगदी बोटांवर मोजता येईल इतक्याच लोकांना तो फॉलो करतोय. या ऑनलाइन ट्रोलिंगमुळे आणि कोणीच त्याला पाठिंबा देत नसल्याने आता त्याने MAMI (मुंबई फिल्म फेस्टिव्हल) च्या बोर्डवरून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  
 करण जोहरने MAMI फिल्म फेस्टिव्हलच्या बोर्डवरून राजीनामा दिला आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या संचालिका स्मृती इराणी यांना त्याने राजीनामा ई-मेलद्वारे पाठविल्याचं कळतंय. घराणेशाहीच्या मुद्द्यावर चित्रपटसृष्टीतील कोणीच पुढे येऊन त्याला पाठिंबा देत नसल्याने तो फार नाराज (karan johar upset with film fraternity)असल्याचंही कळतंय. याचमुळे त्याने या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमधून काढता पाय घेतला आहे.
 
अभिनेत्री दीपिका पदुकोण या फिल्म फेस्टिव्हलची अध्यक्षा आहे. तिने करणला या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचाही सल्ला दिला. मात्र करण त्याच्या निर्णयावर ठाम आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या बोर्डवर करण जोहर व्यतिरिक्त झोया अख्तर, कबीर खान, सिद्धार्थ रॉय कपूर, विक्रमादित्य मोटवाने आणि रोहन सिप्पी हे कलाकार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेअर अॅंड लव्हली: फेअरनेस क्रीमवर अभिनेत्री उषा जाधव म्हणते, मनाचं सौंदर्य, हेच खरं सौंदर्य