बॉलिवूड स्टार कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती सोशल मीडियावर कतरिना कैफला खूप दिवसांपासून स्टॉक करत होती पण जेव्हा विकी कौशलला याची माहिती मिळाली तेव्हा अभिनेत्यानेही त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने ऐकले नाही. या प्रकरणात, अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीच्या आधारे, सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 506-II (गुन्हेगारी धमकी) आणि 354-डी (पाठलाग) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आम्ही एफआयआर नोंदवला आहे आणि त्या व्यक्तीबद्दल अधिक तपशील मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत.