'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचं निधन झालं. आता आझाद यांच्या मृत्यूनंतर डॉक्टरने एक खुलासा केला आहे. यात डॉक्टरांनी त्यांना बॅरिएट्रिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, बेरोजगार होण्याच्या भीतीने त्यांनी आपलं वजन कमी केलं नाही अस म्हटल आहे.
डॉ. मुफी म्हणाले, 'काही दिवसांनंतर ते ठिक झाले. त्यांनी सर्जरी करून १४० किलो वजन कमी केलं. यानंतर ते ठीक झाले. नॉर्मल लाईफ जगू लागले. यानंतर त्यांना दुसरी बॅरिएट्रिक सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, त्यांना ही गोष्ट मान्य नव्हती. सर्जरीनंतर त्यांचं वजन ९० किलो झालं असतं. नंतर त्यांचं वजन २० किलो आणखी वाढलं होतं. म्हणजेच त्यावेळी त्यांचं वजन १६० किलो झालं होतं. जर पुन्हा त्यांनी सर्जरी करून घेतली असती तर आज ते जीवंत असते.