सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पण सतीश यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
सतीश यांनी दिल्लीमधील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली. या पार्टीनंतरच सतीश यांची प्रकृती बिघडली. यादरम्यान विकासची पत्नी सान्वी मालू पतीवर गंभीर आरोप करत आहेत.
सतीश यांची हत्या विकासने केली असल्याचा आरोप सान्वी सातत्याने करत आहे. विकासने काही वर्षांपूर्वी सतीश यांच्याकडून 15 कोटी रुपये घेतले होते. त्याच्याकडे 15 कोटी रुपये परत करण्यासाठी पैसेच नव्हते आणि या वादामधूनच विकासने सतीश यांची हत्या केली असल्याचं सान्वी म्हणत आहेत.
ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
यावर आता या सगळ्या प्रकरणावर सतीश यांच्या पत्नी शशी कौशिक यांनी मौन सोडलं आहे. माध्यमांशी बोलताना त्या “पोलिसांनी संपूर्ण तपास केला आहे. यानंतरही सतीश यांची हत्या करण्यात आली असं ती (सान्वी मालू) का बोलत आहे? हे कळत नाही. पोलिसांनीही या प्रकरणामध्ये तपास करावा असंही मला वाटत नाही. कारण जे काही घडलं ते सगळं समोर आहे.”
Published By -Smita Joshi