Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

किंग खान ने दिली सलमानला लक्‍झरी कार भेट

shahrukh
मुंबई , गुरूवार, 6 जुलै 2017 (09:40 IST)
बॉलिवूडचे करण-अर्जुन, अर्थात किंग खान शाहरुख आणि सुपरस्टार सलमान खान यांची मैत्री जगजाहीर आहे. याच मैत्रीखातर किंग खानने सल्लूला लक्‍झरी कार भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.
 
शाहरुखने ट्युबलाईटमध्ये कॅमिओ करण्यास होकार दिल्यास, आनंद राय यांच्या चित्रपटात गेस्ट अपिअरन्स करण्याचे सलमानने मान्य केले होते. किंग खानने त्याचे वचन पाळले, त्यामुळे साहजिकच सलमान शाहरुखची भूमिका असलेल्या आगामी चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. दिलेला शब्द पाळण्यासाठी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढण्यास सलमान राजी झाला, याचे सलमानला प्रचंड अप्रूप वाटले. त्यामुळेच एक नवीकोरी महागडी कार भेट देऊन शाहरुखने कृतज्ञता व्यक्त केली, असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. ही कार नव्याने लॉंच झाली असून अद्याप हे मॉडेल कोणाकडेच नाही. शाहरुखचे गिफ्ट पाहून सलमानही अचंबित झाला. आनंद एल राय यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. जब तक है जान तील अनुष्का शर्मा, शाहरुख खान, कतरिना कैफ हे त्रिकूट यानिमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहेत. शाहरुख यात एका गाण्यात ठेका धरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी जोक्स : B.B.A.