Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

KKR vs SRH: सामन्यानंतर शाहरुख खान अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल

Shahrukh Khan
, बुधवार, 22 मे 2024 (19:36 IST)
Shahrukh Khan Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders : सध्या चालू असलेल्या IPL 2024 च्या अंतिम सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात क्वालिफायर सामना खेळला गेला, दरम्यान बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान काल अहमदाबादला त्याच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला. उष्णतेमुळे शरीरातील डिहायड्रेशन झाल्याने त्यांना अहमदाबादच्या केडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रुग्णालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
 
शाहरुख खान सोमवारी आयटीसी नर्मदा हॉटेलमध्ये पोहोचले
शाहरुख खानचा कोलकाता नाईट रायडर्स संघ सोमवारी अहमदाबादला पोहोचला. संघाचे खेळाडू विमानतळावरून थेट वस्त्रापूरच्या आयटीसी नर्मदा हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलमध्ये संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. टीम आल्यानंतर लगेचच बॉलिवूड अभिनेता आणि टीमचा मालक शाहरुख खान हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलतर्फे शाहरुख खानसाठी खास पदार्थ तयार करण्यात आले होते.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भूमी पेडणेकरने प्राण्यांना आणि पक्ष्यांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी मुंबईत अनेक पाण्याची भांडी ठेवली!