Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराट पडला प्रेमात, अनुष्का नाही काळजी

Virat Kohli Makes Friends With Sniffer Dog Prince At Pune Stadium
टीम इंडियाचा नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीच्या नव्या प्रेमप्रकरणामुळे त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्माला जरादेखील काळजी नाही. त्याच्या चाहत्यांनी या नव्या प्रेमाला लकी चार्म म्हणून पाहिले पाहिजे. पुण्यातील महाराष्ट्र असोसिएशन स्टेडियमध्ये सरावादरम्यान विराटने आपल्या नव्या प्रेमासोबत वेळ घालवला.
webdunia
फोटो: सोशल मीडिया
आता तुमच्या मनात विराटबाबत थोडी शंका निर्माण झाली असेल पण विराटचे हे नवे प्रेम कोणी मुलगी नसून पोलिसांचा स्निफर कुत्रा प्रिन्स आहे. दरम्यान टीम इंडियाच्या सरावादरम्यान येथील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी प्रिन्सला सुरक्षा कर्मचारी घेऊन आले होते. त्यावेळी विराट या कुत्र्याच्या प्रेमात पडला. त्याने यासोबत काही वेळदेखील घालवला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवाजुद्दीनने 'हरामखोर’ साठी केवळ एक रुपया मानधन घेतले