चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते मंगल ढिल्लन यांचे निधन झाले आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी ते दीर्घकाळ झुंज देत होते. त्यांच्यावर लुधियाना येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारादरम्यान त्यांनी रविवारी जगाचा निरोप घेतला. अभिनेता यशपाल शर्माने सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मंगल हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होते. याशिवाय त्याने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. 1988 मध्ये आलेल्या 'खून भरी मांग' या चित्रपटात ते छोट्या भूमिकेत दिसले होते. यानंतर ते मनोरंजनाच्या दुनियेत सक्रिय राहिले.
अभिनयासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले. या अभिनेत्याचा जन्म फरीदकोटमधील पंजाबी कुटुंबात झाला. येथून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.या नंतर ते कुटुंबासह उत्तर प्रदेश गेले.ते नंतर पंजाबला परतले आणि पुढील शिक्षण घेतले. नंतर थिएटरमध्ये रुजू झाले. 1986 मध्ये त्यांना कथासागर ही पहिली टीव्ही मालिका मिळाली. बुनियाद या प्रसिद्ध टीव्ही मलिकने ते प्रेक्षकांच्या घरा घरात पोहोचले.
आपल्या करिअरमध्ये त्यांनी किस्मत, द ग्रेट मराठा, मुजरिम हाजीर, रिश्ता मौलाना आझाद, नूर जहाँ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. पुढे त्यांना चित्रपटांसाठीही भूमिका मिळू लागल्या. खून भरी मांग नंतर, ते घायल महिला, दयावान, आझाद देश के गुलाम, प्यार का देवता, अकेला, दिल तेरा आशिक, दलाल, विश्वात्मा, निशाना यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसले. त्यांच्या चित्रपट प्रवासात त्यांनी बहुतांश नकारात्मक भूमिका केल्या. तुफान सिंग या चित्रपटात ते अखेरचे मोठ्या पडद्यावर दिसले होते. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता.