Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू" उर्फी जावेदचं ट्विट

webdunia
सोमवार, 9 जानेवारी 2023 (20:47 IST)
उर्फी जावेद (Uorfi Javed) केवळ एकाच कारणाने चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदला बेड्या घालण्याची मागणी केली होती. चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. याला उर्फीने देखील उत्तर दिलं होतं.
 
उर्फी जावेदने यानंतर आता पुन्हा एकदा चित्रा वाघ यांची खिल्ली उडवली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू" असं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी देखील तिने चित्रा वाघ यांना डिवचलं होतं. "आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss" असं म्हटलं होतं. तसेच उर्फीने याआधी "जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे" असं म्हणत चित्रा वाघ यांनी जाहीर आव्हान दिलं आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी जोक : मनुची परदेश वारी