अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी गेल्या काही दिवसांपासून अंडरवर्ल्डकडून धमकीचे मेसेज येत असल्याची तक्रार मांजरेकर यांनी दादर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रार अर्जावरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. हे धमकीचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांच्या मोबाईल क्रमांकावरून येत होते. तसेच हे मेसेज अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या टोळीकडून येत असल्याची माहिती समोर येत आहे. अबू सालेम हा सध्या तळोजा तुरुंगात असून या धमकीप्रकरणी अबू सालेमकडे तुरुंगात जाऊन चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महेश मांजरेकर खंडणी प्रकरणात रत्नागिरी येथून एकाला अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा अबू सालेम अथवा अंडरवर्ल्डशी काहीही संबंध नसल्याचे समजते.