Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

मिस युनिव्हर्सचं कमबॅक

Miss Universe's Comeback
, मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (10:48 IST)
सौंदर्य स्पर्धांच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि यश मिळाल्यानंतर सिनेसृष्टीत येऊन स्टारडम, ग्लॅमर मिळवण्याचा प्रयत्न काही तरुणींनी गेल्या दोन दशकांत केला. यापैकी ऐश्वर्या सध्या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. पण मिस युनिव्हर्स राहिलेली 44 वर्षीय सुष्मिता सेन मात्र गेल्या दशकभरापासून रुपेरी पडद्यावरुन गायब आहे. पण आता 10 वर्षांनंतर सुष्मिता अभिनाच्या क्षेत्रात पुनरागमन करणार आहे.

यापूर्वी 2010 मध्ये सुष्मिता 'नो प्रॉब्लेम' या चित्रपटात झळकली होती. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने पुनरागमन करणार असल्याचे सांगितले आहे. सुष्मिाताने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली तिने काही ओळी लिहिल्या आहेत. सुष्मिता म्हणते की, माझ्या चाहच्यांनी 10 वर्षे माझ्या पुनरागमनाची वाट पाहिली. मला आयुष्यच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेम दिले आणि निष्ठा देऊन प्रोत्साहितही केलं. मी फक्त तुमच्यासाठीच पुनरागन करत आहे' अर्थात सुष्मिता नेमक कोणत्या चित्रपटातून कमबॅक करणार आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'सिनियर सिटिझन्स'साठी खास 'शो' आयोजित