Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mithun Chakraborty Mother Passed Away: मिथुन चक्रवर्तीच्या आईचे निधन

Mithun Chakraborty Mother Passed Away: मिथुन चक्रवर्तीच्या आईचे निधन
, शुक्रवार, 7 जुलै 2023 (16:14 IST)
Mithun Chakraborty Mother Passed Away:अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याची आई शांतराणी चक्रवर्ती यांचे निधन झाले. मिथुनचा धाकटा मुलगा नमाशी याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तीन वर्षांपूर्वी अभिनेत्याचे वडील बन्सत कुमार चक्रवर्ती यांनी या जगाचा निरोप घेतला होता. आता अभिनेत्याच्या आईचे निधन झाले.

मिथुनची आई शांतीराणी  या दीर्घ काळापासून आजारी होत्या. त्यांना हृदयाशी संबंधित आजार होता. त्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होत्या. काल रात्री त्यांनी जगाचा निरोप घेतला. मिथुनचा धाकटा मुलगा नमाशी चक्रवर्ती याने आपल्या आजीच्या निधनाची बातमी दिली आहे.  

एक काळ असा होता जेव्हा मिथुन चक्रवर्ती जोरबाघन येथील एका घरात आई-वडील आणि चार भावंडांसोबत राहत असत. मायानगरी गाठण्यासाठी मिथुनची धडपड कोणापासून लपलेली नाही. आज मिळवलेले यश होण्यासाठी त्याने खडतर संघर्ष केला आहे. नंतर मिथुनने त्याची आई शांतिराणी यांनाही मुंबईत आणले.आणि त्यांची आई त्यांच्या सोबत होती. 

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी शांतीराणी यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले, 'मिथुन दा आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो.

सिने जगतातील कलाकारांनी देखील त्यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त केले आहे. मुंबईत मिथुनच्या आईवर अंत्यसंस्कार होणार आहे. 


Edited by - Priya Dixit   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वयाच्या 68 व्या वर्षी रेखाचे ग्लॅमरस फोटोशूट, चित्रपटांपासून दूर असल्याचे हे कारण सांगितले