14 एप्रिलला सकाळी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता, त्यानंतर मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना गुजरातच्या कच्छमधून अटक केली होती. न्यायालयाने दोघांनाही 25 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.
सलमान खान गोळीबार प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील आरोपींनी मुंबई पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलीस गुजरात रवाना झाले आहे.
दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना गोळीबारात वापरलेल्या बंदुकीबाबत विचारणा केल्यावर त्यांनी धक्कादायक खुलासा केला. आरोपींनी पोलिसांना पुरावा मिळू नये या साठी गोळीबारानंतर आरोपींनी बंदूक तापी नदीत फेकल्याचे सांगितले.
मुंबई गुन्हे शाखा बंदुकीच्या शोधात पुन्हा गुजरातच्या सुरतच्या दिशेने रवाना झाली आहे. पोलिसांना य याप्रकरणात मोठा सुगावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.