Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाना १० दिवसात उत्तर दे महिला आयोगाची नोटीस

नाना १० दिवसात उत्तर दे महिला आयोगाची नोटीस
, बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (10:49 IST)
प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकरांच्या अडचणी वाढत आहेत. महिला आयोगाने तनुश्री दत्ताच्या तक्रारीची दखल घेतली आहे. नाना पाटेकर, गणेश आचार्य, समीर सिद्दीकी, राकेश सारंग यांना महिला आयोगाने नोटीस दिल्या आहेत. सोबतच पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली याचा अहवाल सादर करायला सांगितले आहे. सोबतच  सविस्तर माहितीसाठी तनुश्री दत्ता यांना आयोगात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 दिवसात उत्तर देण्याचे आदेशही महिला आयोगाने दिले आहेत.
 
#NanaPatekar and others have been asked by Maharashtra State Commission for Woman to file their replies within next 10 days. #TanushreeDutta
 
— ANI (@ANI) October 9, 2018
 
सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती (आयसीसी) स्थापन करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली असून, नाना पाटेकरांनी तनुश्रीच्या आरोपांचं खंडन केलं आहे.नानाने देखील वकिलांचा सल्ला घेतला असून तो कोर्टात जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्त्री चित्रपटातील सुंदर अभिनेत्रीचा तोडला होता जबडा #MeToo