Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर : तानाजी सर्वोत्कृष्ट चित्रपट

ajay devan surya
, शुक्रवार, 22 जुलै 2022 (17:18 IST)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 आज दिल्लीमध्ये जाहीर झाले. यामध्ये सुराराई पोतरु या सिनेमासाठी अभिनेता सूर्या यास तर तानाजी चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगण यांना विभागून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार हा सुराराई पोतरु या सिनेमास जाहीर झाला आहे. बिजू मेनन यांना सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. लक्ष्मी प्रिया चंद्रमौली हिला सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
 
कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘कुमकुमारचन’ (देवीची पूजा) मराठीला मिळाला. कचिचिनिथू (द बॉय विथ अ गन) हा सर्वोत्कृष्ट लघुकथा चित्रपट म्हणून निवडला गेला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ‘तुलसीदास ज्युनियर’ची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट गीतलेखनाचा पुरस्कार ‘सायना’ (हिंदी) ला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट हरियाणवी चित्रपट ‘दादा लक्ष्मी’ निवडला गेला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

National Film Awards 2022: 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022' आज जाहीर होणार, हे चित्रपट आणि कलाकार आहेत राष्ट्रीय पुरस्काराचे दावेदार