लोकप्रिय टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये नटू काकाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांचे दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर रविवारी निधन झाले. निर्माता असित कुमार मोदी यांनी ही माहिती दिली.
नायक वयाच्या सत्तरीच्या उत्तरार्धात पोहोचले होते. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना कर्करोगाचे निदान झाले. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते मोदी म्हणाले की, अभिनेत्याची तब्येत गेल्या काही दिवसांपासून खालावत होती.
मोदी म्हणाले, आज संध्याकाळी त्यांचे निधन झाले.ते बराच काळा पासून आजारी होते. त्यांना कर्करोग झाला होता. त्याची तब्येत ठीक नसतानाही त्यांना नेहमी शूट करायचे होते. ते कामात नेहमी आनंदी असायचे .मी त्यांना शोमध्ये आणण्याची संधी शोधत राहिलो, पण त्यांच्यासाठी शूटिंग करणे कठीण होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
नायक यांनी सुमारे 100 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि 300 हून अधिक टीव्ही मालिकांमध्येही ते दिसले आहेत. नायक गुजराती रंगभूमीवरील कामासाठी देखील ओळखले जातात.
या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी केमोथेरपी घेत असताना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या एका विशेष भागाचे चित्रीकरण केले. त्यांच्या पश्चात पत्नीशिवाय तीन मुले आहेत.