बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. निशिकांत यांना यकृताचा आजार होता, हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्यांच्या डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरीक्त रॉकी हँडसम चित्रपटात कामत यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.
सोमवारी सकाळपासून निशिकांत यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र त्यावेळी ते व्हेंटिलेटरवर असल्याचं स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आलं. आता दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करत निशिकांत कामत यांना श्रद्धांजली वाहिली.