Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nitesh Pandey: 'अनुपमा' अभिनेता नितीश पांडे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

Nitesh Pandey: 'अनुपमा' अभिनेता नितीश पांडे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
, बुधवार, 24 मे 2023 (10:34 IST)
facebook
टीव्ही इंडस्ट्रीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी सकाळी अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आता आणखी एका दिग्गज अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे आता आपल्यात नाहीत. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 51 व्या वर्षी त्यांचे निधन झाले 
 
'अनुपमा'मध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या नितीश पांडे यांचे निधन झाले आहे. काल 23 मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अभिनेता 51 वर्षांचे होते.
 
नितेश पांडे यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटी ओलसर डोळ्यांनी अभिनेत्याला अखेरचा निरोप देत आहे.हसतमुख हसरा चेहरा आज आपल्यात नाही यावर विश्वास ठेवणे त्यांना कठीण जात आहे.  
 
अनुपमा शोचा मुख्य अभिनेता सुधांशू पांडे याने नितेश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दोघांमध्ये चांगले बंध असल्याचे त्यांनी सांगितले 
 
त्यांचा अजूनही अभिनेत्याच्या मृत्यूवर विश्वास बसत नाही. अनुपमा शो दरम्यान ते बंध झाले. दोघेही वेब शो, चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर खूप बोलायचे. दोघांची शेवटची भेट काही वेळापूर्वी सेटवर झाली होती 
 
या अभिनेत्याने अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले होते. ओम शांती ओम या चित्रपटात त्याने शाहरुख खानच्या असिस्टंटची भूमिका साकारली होती.  बधाई दो, रंगून, हंटर, दबंग 2, बाजी, मेरे यार की शादी है, मदारी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांने अभिनय केला होता. टीव्ही शोबद्दल सांगायचे तर, त्याने साया, अस्तित्व...एक प्रेम कहानी, हम लड़कियाँ, इंडियावाली माँ, हिरो-गैबे मोड ऑन मधील उत्कृष्ट काम करून सर्वांची मने जिंकली. 
 
वैयक्तिक आयुष्यात नितेश यांचा विवाह अश्विनी काळसेकर यांच्याशी १९९८ मध्ये झाला होता. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. दोघांचा 2002 मध्ये घटस्फोट झाला. नंतर नितेशने टीव्ही अभिनेत्री अर्पिता पांडेशी लग्न केले. नितेश पांडे यांच्या निधनाची बातमी ऐकून अनुपमा शोच्या टीमला धक्का बसला आहे.





Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vaibhavi Upadhyaya:'साराभाई व्हर्सेस साराभाई' अभिनेत्री वैभवीचा कार अपघातात मृत्यू