Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

९१ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर

Nomination of 91st Oscar Awards
, गुरूवार, 24 जानेवारी 2019 (09:57 IST)
येत्या २४ फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणाऱ्या ९१ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली असून त्यात रोमा आणि द फेव्हरिट यांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी दहा नामांकने मिळाली आहेत.रोमा या चित्रपटाची कथा मेक्सिको राष्ट्रात घडते. त्याचे दिग्दर्शन अल्फान्सो क्वारोन यांनी केले आहे. सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या दोन्ही गटात त्याला नामांकने मिळाली आहेत.
 
पुरस्कारांची नामांकने अशी  
 
उत्कृष्ट चित्रपट : ब्लॅक पँथर, ब्लॅक क्लान्झमन, दी बोहेमियन ऱ्हाप्सडी, द फेव्हरिट, ग्रीन बुक, रोमा, अ स्टार इज बॉर्न, व्हाइस
 
सर्वोत्तम अभिनेत्री : यालित्झा अपॅरिशियो -रोमा, ग्लेन क्लोज – द वाइफ, ऑलिव्हिया कोलमन- द फेव्हरिट, लेडी गागा – अ स्टार इज बॉर्न, मेलिसा मॅकार्थी – कॅन यू एव्हर फॉरगिव्ह मी.
 
उत्कृष्ट दिग्दर्शक : स्पाइक ली, ब्लॅकक्लान्झमन, पावेल पावलीकोवस्की, कोल्ड वॉर, योरगॉस लँथीमोस, द फेव्हरिट, अल्फान्सो क्वारोन, रोमा, अ‍ॅडम मॅक्के , व्हाइस
 
सर्वोत्तम अभिनेता : ख्रिस्तियन बेल, व्हाइस, ब्रॅडले कुपर , अ स्टार इज बॉर्न, विल्यम डॅफो, अ‍ॅट इटर्निटीज स्टेट, रामी मॅलेक, बोहेमियन ऱ्हाप्सडी, व्हिगो मॉर्टेन्सन, ग्रीन बुक
 
उत्कृष्ट परभाषिक चित्रपट : कॅपरनम, कोल्ड वॉर, नेव्हर लुक अवे, रोमा, म्शॉपलिफ्टर्स
 
सर्वोत्तम सहअभिनेत्री : अ‍ॅमी अ‍ॅडम्स- व्हाइस, मरिना डी ताविरा, रोमा रेगिना किंग, इफ बियल स्ट्रीट क्लाउड टॉक, एमा स्टोन, द फेवरिट, रेचल वेझ, दी फॅव्हरीट
 
सर्वोत्तम सहअभिनेता : महेर्शला अली- ग्रीन बुक, अ‍ॅडम ड्रायव्हर- ब्लॅकक्लान्झमन, सॅम इलिय- अ स्टार इन बॉर्न, रिचर्ड इ ग्रँट- कॅन यू एव्हर फॉरगिव्ह मी., सॅम रॉकवेल-व्हाइस
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रत्नागिरीत 'ठाकरे' चित्रपट तीन दिवस मोफत