Sameer Khakkar Passed Away: प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते समीर खक्कर यांचे वयाच्या 71 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. समीर खक्कर 80 च्या दशकात दूरदर्शनच्या लोकप्रिय मालिका नुक्कड (1986) मध्ये 'खोपडी' या मद्यपीची अतिशय प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखले जाते.
अनेक अवयव निकामी झाल्याने अभिनेत्याचा मृत्यू झाला
समीर खक्करचा भाऊ गणेश खक्कर यानेही अभिनेत्याच्या मृत्यूच्या कारणांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, समीर खक्कर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत होती. काल दुपारी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे ते बेशुद्ध झाले आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आज पहाटे 4.30 वाजता त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर बोरिवलीतील बाभाई नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. .
समीर यांचा शेवटचा चित्रपट होता 'फर्जी'
समीर खक्कर हे मुंबईच्या बोरिवलीच्या आयसी कॉलनीमध्ये एकटेच राहत असून त्यांची पत्नी अमेरिकेत राहते. समीर यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव सकाळी 10 वाजता जवळच्या स्मशानभूमीत नेण्यात येणार आहे. अॅमेझॉन प्राइमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फर्जी' या मालिकेत ते अखेरचे दिसले होते.
Published By -Smita Joshi