बाहुबलीतील ‘भल्लालदेव’ आता छोट्या पडद्यावर येणार आहे. याबाबत अभिनेता राणा डग्गुबत्तीने ट्विटरवरुन आपल्या नव्या टीव्ही शोबाबत माहिती दिली आहे. शिवाय, टीझरही लॉन्च केला आहे. “तुमच्या आवडत्या स्टारसोबत मैत्री सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आता थेट तुमच्या घरी येणार आहोत…नंबर 1 यारी विथ राणा”, असं ट्वीट करत राणा डग्गुबत्तीने टीझर रिलीज केला आहे. याचसोबत राणाने आणखी एक ट्वीट करुन म्हटलं आहे की, “टीव्ही एक असं माध्यम आहे, जे मला नेहमीच आकर्षित करतं. याच माध्यमातून मी थेट तुमच्या घरी येतोय ‘नंबर 1 यारी विथ राणा’चा होस्ट बनून.”अस लिहील आहे.