Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हुश्श, टक्कर टळली, 'पॅडमॅन' 9 फेब्रुवारीला रिलीज होणार

हुश्श, टक्कर टळली, 'पॅडमॅन' 9 फेब्रुवारीला रिलीज होणार
, शनिवार, 20 जानेवारी 2018 (10:30 IST)
'पॅडमॅन' आता 25 जानेवारी ऐवजी 9 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. पद्मावत रिलीज झाल्यानंतर पॅडमॅन जवळपास दोन आठवड्यांनी रिलीज होणार आहे. त्यामुळे दोन्हीही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर टळली आहे.
 
 ‘पद्मावत’शी टक्कर टाळण्यासाठी आपल्या पॅडमॅन या सिनेमाचं प्रदर्शन अभिनेता अक्षय कुमारने पुढे ढकललं आहे. त्याबद्दल ‘पद्मावत’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी अक्षय कुमारचे आभार मानले. अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ''अनेक संकटांचा सामना करत अखेर 'पद्मावत'च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला आहे. मात्र सिनेमाची 'पॅडमॅन'शी टक्कर होत होती. त्यामुळे अक्षय कुमारला प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली आणि त्याने लगेच होकार दिला. या सहकार्याबद्दल त्याचा नेहमी ऋणी राहिल'', असं भन्साळी यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन