Publish Date: Mon, 26 Dec 2016 (10:15 IST)
Updated Date: Mon, 26 Dec 2016 (10:20 IST)
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याच्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. या अपघातात सेटवरील मुकेश डाकिया (३४) कामगाराचा मृत्यू झाला आहे. तो पेंटर असून फिल्मीसिटीत सदर चित्रपटाच्या सेटवर काम करत होता. काम करत असताना मुकेश पाच फूटाच्या उंचीवरून खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला मार लागला. कोकिलाबेन रुग्णालयाने शुक्रवारी मुकेश मृत पावल्याचे सांगितले. या अपघाताचा अहवाल आरे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून यावर पोलीस तपास सुरु आहे.