Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाशी छेडछाड नाही: दीपिका पादुकोन

‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाशी छेडछाड नाही: दीपिका पादुकोन
, रविवार, 29 जानेवारी 2017 (18:19 IST)
‘पद्मावती’ चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात बोलताना अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने पद्मावती चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. लोकांनी विश्वास ठेवावा आणि सहकार्य करावे असे दीपिका म्हणाली.  पद्मावतीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना काल जयपूरमध्ये राजपूत समाजाशी संबंधित करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.
 
या प्रकारामुळे मला मोठा धक्का बसला असून माझ्या मनात नैराश्याची भावना दाटून आल्याची प्रतिक्रिया दीपिकाने ट्विटवरून व्यक्त केली आहे. दीपिका पदुकोण या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे. मी पद्मावतीची भूमिका करत असल्याने मी एका गोष्टीची निश्चित खात्री देऊ शकते, ती म्हणजे या चित्रपटात इतिहासाचे कुठल्याहीप्रकारे विद्रुपीकरण करण्यात आलेले नाही. एका कर्तृत्त्ववान आणि सामर्थ्यशाली स्त्रीची कहाणी शुद्ध स्वरूपात जगासमोर आणणे हाच आमचा हेतू असल्याचे दीपिकाने स्पष्ट केली.
 
काल संजय लीला भन्साळी यांना राजस्थानमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. सोशल मीडियावर सदर घटनेचे काही फोटो व्हायरल झाले होते. या घटनेनंतर आशुतोष गोवारीकर, राम गोपाल वर्मा, करण जोहर, श्रेया घोषाल यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी संजय लीला भन्साळी यांच्यावरील हल्ल्याचा ट्विटरवरुन निषेध केला होता. दरम्यान, संजय लीला भन्साळीही घटनेनंतर क्रूसह मुंबईत परतणार आहेत. राजस्थानमध्ये पुन्हा कधीही शूटिंग न करण्याचा निर्णयही भन्साळी यांनी घेतला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘पद्मावती’ चे शूटिंग रद्द