Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलीवूडने नाकारले पाकिस्तानी कलाकार, आता येथे काम मिळणे शक्य नाही

Pakistani artists banned in bollywood
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) ने पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एक ठाम पाऊल उचलले आहे. चित्रपट उद्योगात काम करणारे पाकिस्तानी अभिनेते आणि अन्य कलाकारांवर पूर्ण प्रतिबंध लावण्याचे जाहीर केले गेले आहे. तसेच एखाद्या संस्थेने त्यांच्यासोबत काम केल्यास त्यांच्यावर सख्त कार्यवाही केली जाईल. 
 
असोसिएशनच्या महासचिव रौनक सुरेश जैन यांच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात सीआरपीएफ जवानांवर  हल्ला केल्याचा जोरदार निषेध करताना पीडित कुटुंबांना हृदयस्पर्शी सहानुभूती व्यक्त केली गेली आहे. जैन म्हणाले की या प्रकाराचे दहशतवादी आणि अमानवीय कृत्याशी लढण्यासाठी असोसिएशन मजबुतीने देशाबरोबर उभा आहे. 
 
जैन म्हणाले की आम्ही अधिकृतपणे पाकिस्तानच्या अभिनेते आणि अन्य कलाकारांसह काम करण्यावर पूर्ण बंदी घोषित करतो. यानंतर देखील कोणतीही संस्था त्यांच्याबरोबर कार्य करते तर त्यावर देखील बंदी घालण्यात येईल आणि कठोर कारवाई केली जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोनमनं सोशल मीडियावर बदललं आपलं नाव