Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘पठाण’ या शाहरुखच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘पठाण’ या शाहरुखच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
, गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (08:46 IST)
शाहरुखच्या वाढदिवसाची त्याचे चाहते दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतात. आजचा त्याचं हा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठीही खास ठरला. ‘पठाण’ या शाहरुखच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. तर आता ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीने शाहरुख खानच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे.
 
९ सप्टेंबर,२०२२ रोजी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा पहिला भाग चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या हिट किंवा फ्लॉप ठरण्यावरुन बरीच चर्चा झाली, अनेक मतभेद समोर आले. या चित्रपटाने जगभरात ४०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली. चित्रपटातील व्हीएफएक्सची चांगलीच खिल्ली उडवली गेली. मात्र रणबीर आणि आलिया यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तसेच अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाचेही कौतुक झाले. आता हा चित्रपट परवा ओटीटीवर येत आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केआरकेने स्वत:ला शाहरुख खानपेक्षा मोठा चित्रपट स्टार म्हटले , युजर्सने ट्रोल केले